करदात्यांसाठी उद्या 'गुड न्यूज'
देश-विदेश

करदात्यांसाठी उद्या 'गुड न्यूज'

पंतप्रधान कार्यालयाची माहिती

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली | New Delhi -

टॅक्स वेळेत भरणार्‍या प्रामाणिक करदात्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (13 ऑगस्ट) गूड न्यूज देणार आहेत. प्रामाणिक करदात्यांसाठी एक नवं व्यासपीठ केंद्र शासनाने तयार केलं असून याची पंतप्रधान मोदी आज घोषणा करणार आहेत. ‘पारदर्शी कर आकारणी : प्रामाणिकतेचा सन्मान’ असं या व्यासपीठाचं नाव आहे. Transparent Taxation-Honouring the Honest पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) याबाबत माहिती देण्यात आली आहे. Prime Minister Narendra Modi

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणार्‍या या कार्यक्रमाला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर हे उपस्थित असतील. त्याचबरोबर प्राप्तिकर विभागातील अधिकारी आणि पदाधिकार्‍यांशिवाय विविध वाणिज्य विभाग, व्यापारी संघ, चार्टर्ड अकाउंटंट्सचे संघ या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

Prime Minister Narendra Modi will launch a new tax scheme to honour and encourage honest taxpayers of the india on Thursday, August 13

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com