शेअर बाजाराचा नवा विक्रम; Sensex ५७ हजारांच्या पार, Nifty चीही ऐतिहासिक उसळी

शेअर बाजाराचा नवा विक्रम; Sensex ५७ हजारांच्या पार, Nifty चीही ऐतिहासिक उसळी

मुंबई | Mumbai

देशाच्या शेअर बाजाराने (Share Market) विक्रमी झेप घेत ऐतिहासिक उच्चांकी मजल मारली.

सेन्सेक्सने (Sensex) प्रथमच ५७ हजाराचा टप्पा पार केला आहे. दुसरीकडे, निफ्टी (Nifty) १७ हजाराच्या अगदी जवळ आहे. शेअर बाजारातील वाढत्या गुंतवणुकीमुळे सेन्सेक्समध्ये वाढ झाल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

मुंबई शेअर बाजारात सध्या सेन्सेक्स ५७,०११.२१ अंकांवर तर निफ्टी १६,९६१ अंकांवर आहे. सेन्सेक्समध्ये आज भारती एअरटेलच्या शेअरमध्ये सर्वाधिक २.४३ टक्क्यांची तेजी पाहायला मिळत आहे. याशिवाय बजाज फायनान्स, एशियन पेंट्स, टीसीएस, टायटन, कोटक महिंद्रा बँक, बजाज फिनसर्व्ह, टाटा स्टील या कंपन्यांच्या शेअर्समध्येही तेजी पाहायला मिळत आहे.

दुसरीकडे इंडसइंड बँक, एमअँडएम, रिलायन्स इंडस्ट्रीज, अॅक्सीस बँक, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक आणि एसबीआयच्या शेअर्समध्ये घट नोंदविण्यात आली आहे. जागतिक बाजारपेठेतील सकारात्मकतेचा परिणाम भारतीय शेअर बाजारांवर दिसून आला. या तेजीमुळे गुंतवणूकदार एकाच दिवसात साडे तीन लाख काेटी रुपयांनी मालामाल झाले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com