विमान प्रवासासाठी नवी नियमावली
देश-विदेश

विमान प्रवासासाठी नवी नियमावली

निगेटिव्ह रिपोर्ट असणार्‍या प्रवाशांना क्वारंटाईन रहावे लागणार नाही

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिली | New Delhi -

करोना संकटामुळे corona crisis असलेल्या लॉकडाऊनमुळे आंतरराष्ट्रीय प्रवासाला बंदी आहे. मात्र, परदेशात अडकलेल्या नागरिकांनी भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारकडून वंदे भारत योजना सुरू असून नियमित शेकडो प्रवासी या योजनेअंतर्गत परदेशातून मायदेशी परतत आहेत. भारतात परतल्यावर त्यांना कोविड प्रोटोकॉलनुसार काही नियम पाळावे लागत असून केंद्र सरकारने या नियमांत आता शिथिलता आणली आहे. यामुळे प्रवाशांचे आगमन आणि त्यानंतरची प्रक्रिया जलद होणार आहे. International Flights

ज्या प्रवाशाची 96 तासांत केलेली कोव्हीड चाचणी निगेटीव्ह असेल अशा प्रवाशाला क्वारंटाईनमधून सवलत मिळणार आहे. यामुळे कोव्हीड निगेटिव्ह रिपोर्ट असणार्‍या प्रवाशांना आता विमानतळ किंवा त्यानजिक क्वारंटाईन रहावे लागणार नाही.

तसेच, धर्तीवर भारतातून परदेशी जाणार्‍या प्रवाशांना देश सोडण्यापूर्वी करोना ची चाचणी करावी लागणार आहे. त्यांचे करोना चाचणी अहवाल त्यांच्यासोबत पाठवले जाणार आहेत. जेणेकरून तो दाखवून त्यांना विमानतळ सोडण्यास परवानगी मिळेल, असे नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेल्या प्रवाशांना तातडीने सर्व परवानगी मिळावी, यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत. दररोज भारतात आगमन करणार्‍या प्रवाशांना विमानतळातून बाहेर पडण्यास किती कालावधी लागतो त्याचा आढावा घेतला जात आहे. त्यात आणखी काय काय सुधारणा करणे आवश्यक आहे त्या केल्या जातील, असे पुरी यांनी सांगितले.

क्वारंटाईन पॉलिसीनुसार याआधी प्रत्येक प्रवाशाला विमान प्रवासानंतर क्वारंटाईन होणं बंधनकारक होते. यात प्रवाशांचा अनावश्यक वेळ आणि पैसा खर्च होत होता. या प्रक्रियेत मागील काही दिवसांपासून विमानतळावरील कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये खटके उडाल्याची दिसून आले आहे. त्याबाबत माहिती मिळाल्यानंतर क्वारंटाईनची नियमावली शिथिल करण्यात आल्याचे पुरी यांनी सांगितले. अनेक प्रवाशांनी एअरपोर्टवरील कर्मचार्‍यांशी क्वारंटाईनमधून सवलत मिळावी यासाठी हुज्जत घातली आहे.

या सर्व प्रक्रियेने प्रवाशांचा खोळंबा होत होता. त्यामुळे ज्या प्रवाशांची कोव्हीड चाचणी निगेटीव्ह असेल, अशांसाठी क्वारंटाईनमधून सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची अंमलबजावणी शनिवारपासून सुरु झाली असल्याची माहिती पुरी यांनी दिली. कोव्हीड निगेटीव्ह रिपोर्ट ऑनलाइन सादर करून प्रवाशांना क्वारंटाईनमधून सवलत मिळवता येणार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com