LPG सिलेंडर स्वस्त की महाग? जाणून घ्या नवीन दर

LPG सिलेंडर स्वस्त की महाग? जाणून घ्या नवीन दर

मुंबई | Mumbai

LPG सिलेंडरच्या दरात दर महिन्याच्या १ तारखेला बदल होत असतात. त्यामुळे सिलेंडरचे भाव दर महिन्याला कमी जास्त होतात. या महिन्यात थोडा दिलासा मिळाला आहे...

घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत गेल्या काही महिन्यांपासून कोणताही दिलासा मिळालेला नाही. डिसेंबरमध्ये सरकारी तेल कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या दरात कोणत्याही प्रकारे वाढ केलेली नाही, म्हणजेच वाढत्या किमतींपासून दिलासा मिळाला आहे.

गॅस सिलेंडर आणि कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या दरात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत 115.50 रुपयांची कपात करण्यात आली होती.

१४ किलोग्रॅम गॅस सिलिंडरच्या किंमतीत शेवटचा बदल ६ ऑक्टोबर रोजी झाला होता. ऑक्टोबरमध्ये देशांतर्गत एलपीजीच्या किंमतीत १५ रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्याचबरोबर 22 मार्चला किमती 50 रुपयांनी वाढल्या होत्या. सध्या दिल्लीमध्ये कमर्शियल गॅसच्या किमती 1744 रुपये तर मुंबईत 1696 रुपये आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com