मलेशियात नवीन करोना विषाणू ; 10 पट अधिक वेगाने संसर्ग

D614G विषाणू
मलेशियात नवीन करोना विषाणू ; 10 पट अधिक वेगाने संसर्ग

नवी दिल्ली | New Delhi -

मलेशियामध्ये एका नवीन प्रकारचा (स्ट्रेनचा) करोना विषाणू आढळला आहे. डी614जी (D614G) या विषाणूचा संसर्ग सध्याच्या विषाणूपेक्षा 10 पट अधिक वेगाने होत असल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे भारतामधून मलेशियामध्ये परतलेल्या एका हॉटेल मालकाच्या माध्यमातून करोनाचा संसर्ग झालेल्या काही जणांमध्ये हा विषाणू आढळून आला आहे. यासंदर्भातील वृत्त ब्लुमबर्गने दिलं आहे. Malaysia has detected a strain of the new coronavirus

दोन वेगवेगळ्या कस्टरमधील 45 करोना रुग्णांपैकी तिघांमध्ये हा विषाणू आढळून आला आहे. यापैकी एका गटाला भारतामधून परतलेल्या व्यक्तीमुळे संसर्ग झाला आहे. या व्यक्तीने 14 दिवस होम क्वारंटाइन होण्याच्या नियमाचे पालन केले नाही. त्याच्या संपर्कात आलेल्या 45 जणांना करोनाची बाधा झाली. या व्यक्तीला पाच महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याचप्रमाणे फिलिपिन्सवरुन मलेशियामध्ये परतलेल्या काही जणांमध्येही या विषाणूचे अंश आढळून आले आहेत.

मलेशियातील आरोग्य खात्याच्या व्यवस्थापकीय संचालक असणार्‍या नूर हीशाम अब्दुल्ला यांनी या नवीन विषाणूवर सध्या शोध सुरु असणारी औषधं आणि लस प्रभावी ठरणार नाही अशी शक्यता व्यक्त केली आहे. लोकांनी अधिक काळजी घेणं गरजेचे आहे. कारण आता मलेशियामध्ये नवीन प्रकारचा करोना विषाणू आढळून आला आहे, असं अब्दुल्ला यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. या नवीन विषाणूमुळे होणार्‍या संसर्गाची साखळी मोडण्यासाठी जनतेचे सहकार्य खूप महत्वाचे आहे, असंही अब्दुल्ला यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com