नेपाळच्या पंतप्रधानपदी पुन्हा केपी शर्मा ओली यांचीच नियुक्ती

नेपाळच्या पंतप्रधानपदी पुन्हा केपी शर्मा ओली यांचीच नियुक्ती

दिल्ली | Delhi

नेपाळच्या राजकारणात पुन्हा एकदा उलथापालथ झाली आहे. विरोधी पक्ष बहुमतासाठी आवश्यक मते मिळवू न शकल्याने विश्वासदर्शक ठराव हरल्यानंतरही के पी शर्मा ओली पुन्हा एकदा नेपाळचे पंतप्रधान बनले आहे. नेपाळच्या राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांनी पंतप्रधानपदी पुन्हा के पी शर्मा ओली यांची नियुक्ती केली आहे.

सोमवारी ओली हे नेपाळच्या संसदेत बहुमत सिद्ध करण्या अपयशी ठरल्यानंतर, राष्ट्रपतींनी विरोधी पक्षांना काल रात्री नऊ वाजेपर्यंत आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी मुदत दिली होती. मात्र ते सुद्धा याबाबतीत अपयशी ठरल्यामुळे राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांनी ओली यांची पुन्हा पंतप्रधानपदी नियुक्ती केली आहे. ते आज आपल्या पदाची शपथ घेणार असून, पुढील ३० दिवसात त्यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.

नेपाळच्या संसदेत एकूण २७१ खासदार आहेत. त्यापैकी ओलीच्या यांच्या सीपीएल यूएमएल या पक्षाकडे १२१ जागा आहेत. त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी १३६ जागांची आवश्यकता आहे. तीन दिवसापूर्वी झालेल्या विश्वासदर्शक ठरावावेळी ओली यांना फक्त ९३ मतं पडली होती. त्यांना कमीत कमी १३६ मतांची आवश्यकता होती. विश्वासदर्शक ठरावाविरोधात १२४ मतं पडली होती. १५ खासदार तटस्थ होते. तर ३५ खासदार मतदानावेळी गैरहजर होते. त्यामुळे त्यांचं पंतप्रधानपद गेलं होतं.

पंतप्रधान ओली यांनी भारताबाबत घेतलेल्या वादग्रस्त निर्णयामुळे सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षात मतभेद सुरु झाले होते. भारताविरोधात घेतलेली भूमिका आणि वक्तव्यांमुळे नेपाळमधील नागरिकांमध्ये असंतोष पसरला होता.

ओली यांच्या कार्यकाळात नेपाळने जारी केलेल्या नव्या नकाशामध्ये भारत नेपाळ सीमेवरील कालापानी-लिंपियाधुरा-लिपुलेक हे प्रदेश नेपाळचा भाग असल्याचे दाखवण्यात आलं होतं. तर दुसरीकडे चीनने हुमला येथे नेपाळच्या सीमेजवळचा बराच मोठा भाग बळकावला असल्याचं समोर आलं आहे. भारतात असलेली अयोध्या खरी नसून बनावट अयोध्या आहे. तसंच प्रभू रामचंद्र नेपाळी होते असा अजब दावाही नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी केला होता.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com