NEET Exams Results : लवकरच लागणार 'नीट' परीक्षेचा निकाल

NEET Exams Results : लवकरच लागणार 'नीट' परीक्षेचा निकाल

दिल्ली | Delhi

गेल्या काही दिवसांपासून देशातील NEET पदवी परीक्षांचे निकाल खोळंबले होते. पण आता त्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने मोकळा केला आहे.

NEET Exams Results : लवकरच लागणार 'नीट' परीक्षेचा निकाल
MPSC ची जाहिरात, तब्बल 666 जागांसाठी भरती

आज सर्वोच्च न्यायाल्याने नॅशनल टेस्टिंग एजन्सीला (NTA) नीट परीक्षेचा निकाल (NEET Exam Details) जाहीर करण्याचे आदेश दिले आहे. सोबतच महाराष्ट्रातील दोन विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याच्या मुबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) आदेशाला स्थगिती दिली आहे.

NEET Exams Results : लवकरच लागणार 'नीट' परीक्षेचा निकाल
पाकिस्तानचा विजय साजरा करणाऱ्या तिघांना अटक

ज्या दोन विद्यार्थ्यांमुळे नीट परीक्षेचा निकाल रोखण्यात आला होता, त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत झालेल्या चुकीची दुरुस्ती करण्यात येईल असे एनटीएने सर्वोच्च न्यायालयाला (Supreme Court) सांगितले आहे. दोन विद्यार्थ्यांसाठी १६ लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य अधांतरी ठेवता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.

मुंबई उच्च न्यायालयानं NTA ला निकाल रोखून ठेवण्यास सांगितलं होतं आणि परीक्षेचा प्रयत्न करताना अडचणी आलेल्या दोन विद्यार्थ्यांसाठी पुन्हा वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यास सांगितलं होतं. मात्र दोन विद्यार्थ्यांसाठी इतर सर्व विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवणं अमान्य असल्यामुळे सुप्रीम कोर्टानं आदेश रद्द करत NEET चा निकाल लवकरच जाहीर करण्यात यावा असे आदेश दिले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com