दिल्ली | Delhi

इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) आज (11 डिसेंबर 2020) रोजी देशभरात डॉक्टरांच्या संपाची (Doctors’ Strike) घोषणा केली आहे. 11 डिसेंबर रोजी सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेत सर्व गैर-आपत्कालीन आणि गैर-कोविड वैद्यकीय सेवा बंद असतील. आयएमएने मॉडर्न मेडिसिनच्या सर्व डॉक्टरांना संपात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

कोणकोणत्या सेवा बंद ठेवण्याचं आवाहन?

सर्व दवाखाने

सर्व नॉन इमर्जंन्सी हेल्थ सेंटर

सर्व ओपीडी

इलेक्टिव सर्जरी

कोणकोणत्या सेवा सुरु राहणार?

अत्यावश्यक आरोग्य सेवा

अतिदक्षता कक्ष

कोविड केअर सेंटर

सीसीयू

अत्यावश्यक शस्त्रक्रिया

काही दिवसांपूर्वी सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले होते की, आयुर्वेद डॉक्टर सामान्य आणि ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया सोबतच नेत्र, कान, घसा शस्त्रक्रिया देखील करू शकतील. केंद्र सरकारने नुकताच एक अध्यादेश काढला आहे. यामध्ये आयुर्वेदातील पदव्युत्तर डॉक्टरांना 58 प्रकारच्या शस्त्रक्रिया शिकण्याची आणि अभ्यास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. सीसीआयएमने 20 नोव्हेंबर 2020 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत 39 सामान्य शस्त्रक्रिया प्रक्रिया सूचीबद्ध केल्या, त्यातील 19 प्रक्रिया डोळे, नाक, कान आणि घश्याशी संबंधित आहेत.