उद्यापासून 16 जानेवारी 'राष्ट्रीय स्टार्ट-अप डे'; पंतप्रधानांची घोषणा

उद्यापासून 16 जानेवारी 'राष्ट्रीय स्टार्ट-अप डे'; पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

देशात दरवर्षी 16 जानेवारीला 'राष्ट्रीय स्टार्ट-अप डे' (National Start-Up Day) साजरा केला जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्टार्टअप उद्योजकांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली...

पंतप्रधान म्हणाले की, मी सर्व स्टार्टअप्सचे, इनोव्हेटिव्ह (Innovative) तरुणांचे अभिनंदन करतो, जे स्टार्टअपच्या जगात भारताचा (India) झेंडा उंचावत आहेत. स्टार्टअपची ही संस्कृती देशाच्या दूरवरच्या भागात पोहचण्यासाठी 16 जानेवारी हा राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

देशात मुलांमध्ये इनोव्हेशनचे आकर्षण लहानपणापासूनच निर्माण करणे आणि देशातील इनोव्हेटिव्ह उपक्रमांना संस्थात्मक रूप देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. 9 हजारांहून अधिक अटल टिंकरिंग लॅब आज मुलांना नवनवीन शोध आणि नवीन कल्पनांवर काम करण्याची संधी देत ​​आहेत.

इनोव्हेशनबाबत भारतात सुरू असलेल्या मोहिमेचा परिणाम असा झाला आहे की ग्लोबल इनोव्हेसन इंडेक्समध्ये भारताच्या क्रमवारीतही बरीच सुधारणा झाली आहे. 2015 मध्ये भारत या क्रमवारीत 81 व्या क्रमांकावर होता. आता इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारत 46 व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

स्टार्टअप उद्योगांच्या वाढीला तसेच विकासाला चालना देण्यासाठी सरकारने सक्षम वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने काम केले आहे. याचा देशातील स्टार्टअप इको-सिस्टीमवर प्रचंड प्रभाव पडला आहे आणि त्यामुळे देशातील या क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे, असेदेखील पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com