शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनासह नाश्ताही
देश-विदेश

शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनासह नाश्ताही

नव्या शैक्षणिक धोरणातील शिफारस

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली | New Delhi -

देशभरातील सरकारी आणि अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना सध्या मध्यान्ह भोजन दिले जाते,mid-day meals पण नव्या शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांना सकाळी सर्वप्रथम नाश्ता Breakfast देण्याचीही शिफारस करण्यात आली आहे. National Education Policy (NEP) 2020

या नव्या धोरणाला शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. विद्यार्थ्यांना सकाळी पोषक आहार मिळाल्यास त्यांचे अभ्यासात चांगले लक्ष लागेल आणि ते अधिक लक्ष देऊन अभ्यास करू शकतील. या अनुषंगाने मध्यान्ह भोजनाआधी त्यांना पोषक अशी न्याहारी मिळायला हवी, असे या धोरणाच्या मसुद्यात नमूद आहे.

मुलांना जर पोषक अन्न खायला मिळत नसेल, त्यांचे आरोग्य सुदृढ नसेल, तर अभ्यासात त्यांचे लक्ष लागणार नाही. अशा स्थितीत विद्यार्थ्यांच्या सुदृढ आरोग्याचा विचार सर्वप्रथम व्हायला हवा. पोषक आहारामुळे त्यांना ऊर्जा मिळेल, आरोग्य तंदुरुस्त राहील आणि त्याचा सकारात्मक परिणाम अभ्यासावर होईल. पोषक न्याहारी तर आवश्यक आहेच, याशिवाय त्यांना योग्य मार्गदर्शन मिळायला हवे आणि त्यासाठी चांगल्या समोपदेशकाचीही नियुक्ती केली जावी, अशी शिफारसही या धोरणातून करण्यात आली आहे.

विद्यार्थी सकाळी शाळेत आल्यानंतर काही वेळातच त्यांना भूक लागलेली असते, पण त्यांना दुपारपर्यंत जेवणाची प्रतीक्षा करावी लागते. या कालावधीत भुकेमुळे व्याकूळ होऊन, त्यांचे अभ्यासावरील लक्ष उडालेले असते. शिक्षक काय शिकवत आहे, याकडे त्यांचे लक्ष नसते. मात्र, पोषक न्याहारीमुळे प्राप्त झालेली ऊर्जा दुपारच्या जेवणापर्यंत कायम असते, असे काही अभ्यासांमधूनही दिसून आले आहे. ज्या शाळांमध्ये गरम आणि ताजी न्हाहारी किंवा जेवण देणे शक्य नसते, तिथे फळे, गूळ-शेंगदाणे, चणे अशा प्रकारचे पदार्थ द्यायला हवे अशी शिफारस नव्या शैक्षणिक धोरणातून करण्यात आली आहे.

नियमित आरोग्य तपासणी

सर्व शाळांमध्ये मुला-मुलींची नियमित आरोग्य तपासणी केली जावी, शाळेतील वातावरण शंभर टक्के पोषक असावे. हवा खेळती राहण्यास वाव असावा आणि तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना आरोग्य पत्र देण्यात यावे, अशी शिफारसही नव्या शैक्षणिक धोरणात आहे.

बालवाटिका

पाच वर्षांच्या खालील मुलगा किंवा मुलीला बालवाटिकेत पाठविण्यात यावे. तेथील शिक्षण खेळांवर आधारित असावे, ज्यामुळे त्यांची आकलनशक्ती व प्रभावशक्ती वाढेल. या शिक्षणात आकडेमोडीवर भर दिला जावा आणि त्यांनाही पोषक असे माध्यान्ह भोजन उपलब्ध केले जावे अशी शिफारसही नव्या शैक्षणिक धोरणात आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com