योगी सरकारचा मोठा निर्णय! उत्तर प्रदेशातील सर्वच मदरशांत राष्ट्रगीत अनिवार्य

योगी सरकारचा मोठा निर्णय! उत्तर प्रदेशातील सर्वच मदरशांत राष्ट्रगीत अनिवार्य

दिल्ली | Delhi

उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता उत्तर प्रदेशमधील सर्व मदरशांमध्ये (madrasas) राष्ट्रगीत (National Anthem) अनिवार्य करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेश मदरसा शिक्षण बोर्डाने (Madrasa Education Board Council) यासंबंधीचे आदेश जारी केलेत. हा आदेश सर्वच मान्यताप्राप्त, अनुदानित व विनाअनुदानित मदरशांवर लागू असेल. या आदेशानुसार, वर्ग सुरू होण्यापूर्वी प्रार्थनेवेळी राष्ट्रगीत होईल. (National Anthem made mandatory in madrasas in Uttar Pradesh by Yogi govt)

योगी सरकारचा मोठा निर्णय! उत्तर प्रदेशातील सर्वच मदरशांत राष्ट्रगीत अनिवार्य
बघा नजरेतून वाचता आलं तर...! तेजस्विनी पंडीतचा साडीतील किलर लूक एकदा पाहाच

रमजान व ईदच्या सुट्टीनंतर गुरुवार म्हणजे आजपासून सर्वच मदरसे सुरू झालेत. तर १४ तारखेपासून मदरशांत बोर्ड परीक्षा होणार आहेत. त्यामुळे हा आदेश तत्काळ प्रभावाने लागू झाला आहे.

योगी सरकारचा मोठा निर्णय! उत्तर प्रदेशातील सर्वच मदरशांत राष्ट्रगीत अनिवार्य
राणादा अन् पाठकबाईचा एकमेकांत जीव रंगला; पहा साखरपुड्याचे खास फोटो

तसेच मदरशांमध्ये राष्ट्रगीत म्हटलं जातंय की नाही याची पडताळणी देखील केली जाणार आहे. उत्तर प्रदेशांमध्ये सकाळी वर्ग सुरु होण्यापूर्वी दुआ पठण केलं जातं. पण आता दुआ पठणाबरोबरच राष्ट्रगीत म्हणणं हे देखील बंधनकारक असणार आहे.

Related Stories

No stories found.