जेएनयुतील हल्ल्याची सखोल चौकशी करुन हल्लेखोरांना कठोर शिक्षा करा – रामदास आठवले
देश-विदेश

जेएनयुतील हल्ल्याची सखोल चौकशी करुन हल्लेखोरांना कठोर शिक्षा करा – रामदास आठवले

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

मुंबई | नवी दिल्ली

देशातील प्रतिष्ठित विद्यापीठ असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठा ( जे एन यु ) मध्ये विद्यार्थ्यांवर चेहरा झाकून आलेल्या हल्लेखोरांनी भ्याड हल्ला केला.

या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करीत सखोल चौकशी करून हल्लेखोरांना त्वरित अटक करावी; हल्लेखोर कोणीही असो त्यांच्या मुसक्या  आवळून त्यांच्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली आहे.

आज ना. रामदास आठवले दिल्लीला रवाना झाले असून जेएनयु येथील घटनास्थळाला भेट देणार आहेत. जे एन यु सारख्या प्रतिष्ठित विद्यापीठात विद्यार्थ्यांवर असा हल्ला होणे हे लोकशाही राज्यव्यवस्थेवर कलंक ठरत आहे.

असे प्रकार हाणून पाडले पाहिजेत. पुन्हा अशा हल्ल्याच्या घटना घडू नयेत यासाठी या हल्ल्याची सखोल चौकशी करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा करावी. पुन्हा  असे प्रकार घडू नयेत यासाठी  सरकार दक्ष राहील असे सांगत आज जेएनयू भेट देणार असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले.

Deshdoot
www.deshdoot.com