करोनाची तिसरी लाट! 'नेजल व्हॅक्सिन' लहान मुलांसाठी गेम चेंजर ठरणार?

जागतिक आरोग्य संघटनेच्या वरिष्ठ शास्त्रज्ञांचा दावा
करोनाची तिसरी लाट! 'नेजल व्हॅक्सिन' लहान मुलांसाठी गेम चेंजर ठरणार?

दिल्ली | Delhi

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला असून दिवसेंदिवस हा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता देखील वर्तवली जात आहे. पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिक आणि दुसऱ्या लाटेत तरुणांना करोनाचा संसर्ग झाला. संसर्गाचं वय खाली आले आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र या सर्वात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) वरिष्ठ शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांच्या मते करोनाची नेजल व्हॅक्सिन अर्थात नाकावाटे दिली जाणारी लस लहान मुलांसाठी गेम चेंजर ठरू शकते. करोना विषाणूंपासून मुलांना संरक्षण देण्यात प्रभावी ठरू शकते. सौम्या स्वामीनाथन यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना हा दावा केला आहे.

स्वामीनाथन यांच्या मते नेजल व्हॅक्सिन अर्थात नाकावाटे दिली जाणारी लस लहान मुलांसाठी गेम चेंजर ठरू शकते. ही लस इतर लशींपेक्षा अधिक फायदेशीर ठरणारी असेल. शिवाय ही लस घेणे देखील सहजसोपे असेल.

याबरोबरच अधिकतर शालेय शिक्षकांनी व्हॅक्सिन घेणे आवश्यक आहे. तसेच जेव्हा मुलांमध्ये कोरोना विषाणू प्रसारित होण्याचा धोका कमी होईल तेव्हाच मुलांना शाळेत पाठवावे. 'भारतात बनलेली नेजल व्हॅक्सिन लहान मुलांसाठी गेम चेंजर ठरू शकते. मुलांना ही लस देणे सोपे आहे. शिवाय ही रेस्पिरेटरी ट्र्रॅकमध्ये प्रतिकारशक्ती वाढवेल असेही त्या म्हणाल्या आहेत.

हैद्रराबादस्थित भारत बायोटेक कंपनीने नेजल व्हॅक्सिनची चाचणी सुरू केली आहे. या लसीद्वारे नाकातून डोस दिले जातील. डब्ल्यूएचओच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ सोम्या स्वामीनाथन यांच्या मते हे करोना विषाणूंपासून मुलांना संरक्षण देण्यात प्रभावी ठरू शकते. हे व्हॅक्सिन नाकावाटे दिले जाणार आहे. कंपनीच्या मते नेजल स्प्रेचे केवळ ४ थेंब पुरेसे असतील. दोन्ही नाकपुड्यांमध्ये दोन-दोन थेंब टाकले जातील.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com