वंदे भारत एक्सप्रेसला सलग दुसऱ्या दिवशी अपघात

वंदे भारत एक्सप्रेसला सलग दुसऱ्या दिवशी अपघात

दिल्ली | Delhi

मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या हायटेक वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसला सलग दुसऱ्या दिवशी जनावरांनी धडक दिली आहे. मात्र, या दुर्घटनेत कोणतीही जीवित आणि वित्त हानी झाली नाही.

गांधीनगरहून (gandhinagar) मुंबईला (Mumbai) जात असताना कंझरी आणि आनंद स्थानकादरम्यान हा अपघात झाला. याआधी मणिनगर स्थानकाजवळ म्हशींच्या कळपाला रेल्वेची धडक बसली होती. दुरुस्तीनंतर ही गाडी आज पुन्हा रुळावर आणण्यात आली होती.

गुजरातमध्ये गुरुवारी सकाळी वंदे-भारत एक्सप्रेस ट्रेनने म्हशींच्या कळपाला धडक दिल्यानंतर रेल्वे संरक्षण दलाने (RPF) या गुरांच्या मालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com