Mukesh Ambani
Mukesh Ambani
देश-विदेश

वॉरेन बफेट यांना मागे टाकत मुकेश अंबानी जगातील सातवे सर्वात श्रीमंत व्यक्ती

त्यांची एकूण संपत्ती ७० अब्ज डॉलर एवढी आहे.

Nilesh Jadhav

मुंबई | Mumbai

भारतील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी बर्कशायर हॅथवेच्या वॉरेन बफेट, गूगलचे लॅरी पेज आणि सर्गी ब्रिन यांना मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सातव्या स्थानावर झेप घेतली आहे.

फोर्ब्स मॅगझिनने दिलेल्या माहितीनुसार त्यांची एकूण संपत्ती ७० अब्ज डॉलर एवढी आहे. २० जून रोजी मुकेश अंबानी फोर्ब्सच्या लिस्टमध्ये नवव्या स्थानी होते. त्यावेळी त्यांची एकूण संपत्ती ६४.५ अब्ज डॉलर एवढी होती. २० दिवसांत त्यांची संपत्ती ५.४ अब्ज डॉलर्सनी वाढली आहे.

या यादीत जेफ बेजोस पहिल्या, बिल गेट्स दुसऱ्या, बर्नार्ड ऑर्नोल्ट फॅमिली तिसऱ्या तर फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क जुकरबर्ग चौथ्या क्रमांकावर आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com