मुकेश अंबानी पुन्हा ठरले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, अदानी कितव्या स्थानावर?

मुकेश अंबानी पुन्हा ठरले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, अदानी कितव्या स्थानावर?

दिल्ली | Delhi

मुकेश अंबानी पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. 'फोर्ब्स'ने मंगळवारी जारी केलेल्या २०२३ च्या अब्जाधीशांच्या यादीत ही माहिती दिली. मुकेश अंबानी ८३.४ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. तर ते जगातील ९ व्या क्रमांकाचे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत.

मुकेश अंबानी यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी गौतम अदाणी जागतिक यादीत २४ व्या स्थानावर घसरले आहेत. २४ जानेवारी रोजी अदाणी हे जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. त्यावेळी त्यांची संपत्ती १२६ अब्ज डॉलर होती. मात्र, हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर त्यांच्या कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत मोठी घसरण झाली.

मुकेश अंबानी पुन्हा ठरले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, अदानी कितव्या स्थानावर?
राज्यावर पुन्हा अवकाळीचं संकट; काय आहे हवामान विभागाचा अंदाज?

अदाणी यांची सध्या ४७.२ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे आणि ते अंबानीनंतर दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत भारतीय आहेत. ८३.४ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह ६५ वर्षीय अंबानी अब्जाधीशांच्या यादीत नवव्या स्थानावर आहेत. एचसीएलचे शिव नाडर यांनी २५.६ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह देशातील तिसऱ्या सर्वात श्रीमंत व्यक्तीचे बिरुद मिरवता आहेत.

मुकेश अंबानी पुन्हा ठरले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, अदानी कितव्या स्थानावर?
अमोल कोल्हे करणार अमृता खानविलकरशी लग्न? Instagram पोस्टमुळे चर्चांना उधाण

देशातील श्रीमंतांच्या यादीत कोण?

भारतात सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी पहिल्या स्थानावर तर गौतम अदानी दुसऱ्या स्थानावर आहेत. फोर्ब्सच्या यादीनुसार शिव नाडर हे तिसरे सर्वात श्रीमंत भारतीय आहेत. सायरस पूनावाला हे देशातील चौथे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. लक्ष्मी मित्तल हे पाचव्या स्थानावर आहेत.ओपी जिंदाल ग्रुपच्या सावित्री जिंदाल सहाव्या, सन फार्माचे दिलीप सांघवी सातव्या आणि डीमार्टचे राधाकृष्ण दमानी आठव्या क्रमांकावर आहेत.

मुकेश अंबानी पुन्हा ठरले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, अदानी कितव्या स्थानावर?
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांना अटक; Porn Star प्रकरण भोवलं
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com