मुकेश अंबानी झाले आजोबा; मुलगी ईशाला झाली जुळी मुले, नावंही ठरली!

मुकेश अंबानी झाले आजोबा; मुलगी ईशाला झाली जुळी मुले, नावंही ठरली!

मुंबई | Mumbai

देशातील सर्वात आघाडीच्या उद्योजक घराण्यांपैकी एक असलेल्या अंबानी कुटुंबाला एक आनंदाची बातमी मिळाली आहे. मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी हिने शनिवारी जुळ्या मुलांना जन्म दिला.

१२ डिसेंबर २०१८ रोजी ईशा अंबानींचे लग्न पिरामल ग्रुपचे आनंद पिरामल यांच्याशी झाले होते. या दाम्पत्याला मुलगा आणि मुलगी अशी जुळी मुलं झाल्याने सध्या अंबानी आणि पीरामल कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अंबानी कुटुंबीयांकडून या दोन्ही जुळ्या मुलांचे नामकरणही करण्यात आले आहे. मुलाचे नाव कृष्णा आणि मुलीचे नाव आदिया ठेवण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com