देशात अडीच लाखांहून अधिक करोनाबाधित; राज्यात काय?
करोना

देशात अडीच लाखांहून अधिक करोनाबाधित; राज्यात काय?

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

देशभरात करोनाचे (Corona) थैमान वाढत आहे. दैनंदिन रूग्ण संख्येत मोठी प्रमाणात वाढ होत आहे. देशात गेल्या २४ तासात अडीच लाखांहून अधिक नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याशिवाय करोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा (Omicron) संसर्गदेखील वाढताना दिसून येत आहे...

देशभरात मागील २४ तासात २ लाख ६८ हजार ८३३ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. ही संख्या काल आढळलेल्या करोना बाधितांपेक्षा ४ हजार ६३१ रूग्णांनी जास्त आहे. तसेच १ लाख २२ हजार ६८४ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. याशिवाय, मागील २४ तासात ४०२ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशातील ॲक्टिव्ह केसेसची (Active Cases) संख्या १४ लाख १७ हजार ८२० आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट (Positivity Rate) १६.६६ टक्के आहे. ६ हजार ४१ ओमायक्रॉनबाधित आतापर्यंत आढळले आहेत. आजपर्यंत एकूण ४ लाख ८५ हजार ७५२ करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

दरम्यान राज्यात 43 हजार 211 नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. दिवसभरात 33 हजार 356 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर हा 94.28 टक्के इतका झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com