दिल्ली l Delhi

देशात रुग्णांची संख्या वाढत आहेत. याशिवाय मृतांचा आकडा देखील वाढला आहे. मात्र असं असलं तरी सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे.

मागील २४ तासांमध्ये देशभरात २२ हजार २७२ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली, तर २५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, याच कालावधीत देशात २२ हजार २७४ जण करोनामुक्त देखील झाले आहेत. देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता १ कोटी १ लाख ६९ हजार ११८ वर पोहचली आहे. आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे. सद्यस्थितीस देशात २ लाख ८१ हजार ६६७ सक्रिय रुग्ण असून, ९७ लाख ४० हजार १०८ जण करोनामुक्त झालेले आहेत. याशिवाय आतापर्यंत देशभरात १ लाख ४७ हजार ३४३ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू देखील झालेला आहे.

महाराष्ट्रातील स्थिती

महाराष्ट्रात काल १ हजार ४२७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १८ लाख ०६ हजार २९८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.४ % एवढे झाले आहे. आज राज्यात ३ हजार ४३१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात काल ७१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी २४ लाख ०१ हजार ६३७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९ लाख १३ हजार ३८२ (१५.४३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४ लाख ७७ हजार ५२८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३ हजार ६९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.