
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
बांगलादेशमध्ये (Bangladesh) एक मोठी दुर्घटना घडली आहे. नदीत बोट (Boat) उलटल्याने काही नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे...
याबाबत अधिक माहिती अशी की, बांगलादेशात रविवारी पंचगड जिल्ह्यात (Panchgad District) ओव्हरलोड बोट उलटली. यात 2४ हून अधिक जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.
बोडा येथील उपजिल्ह्याच्या औलिरिया घाट येथे हा अपघात झाला. बोडा, पंचपीर, मारिया आणि बांघारी भागातील हिंदू समाजातील लोक महालयाच्या निमित्ताने औलिया घाटातून बधेश्वर मंदिराच्या दिशेने बोटीतून प्रवास करत प्रार्थना करण्यासाठी जात होते. यावेळी ही दुर्घटना घडली आहे.
बोटीत 70 हून अधिक लोक होते. बोटीत क्षमतेपेक्षा जास्त लोक भरल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. रविवारी रात्रीपर्यंत बचावकार्य सुरू होते. या अपघातामध्ये झालेल्या मृतदेहांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.