
मुंबई | Mumbai
देशात गेल्या २४ तासांत करोनाच्या (Covid-19) रुग्णांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचे बघायला मिळत आहे. करोना रुग्णांचा वेग हा झपाट्याने वाढत (Covid petients Increasing) असल्याने करोना रुग्णांची चिंता वाढली आहे. गेल्या २४ तासांत देशातील करोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा १० हजार पार गेली आहे तर गेल्या २४ तासांत देशात ३८ जणांचा मृत्यू झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत १०,५४२ करोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे तर ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आता एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या आता ४,४८,४५, ४०१ वर पोहोचली आहे तर एकूण मृतांची संख्या ५,३१, १९० वर पोहोचली आहे. सध्या देशात पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ६३, ५६२ इतकी आहे तर सध्या भारताचा पॉझिटीव्हीटी दर ४.३९ टक्के इतका आहे.
दरम्यान देशात करोनाचे रुग्ण पुन्हा एकदा झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील सर्वच राज्यांना करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याचा सूचना केल्या आहे. तसंच करोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता नागरिकांनी मास्कचा वापर करावा आणि काळजी घ्यावी असे आवाहन केले जात आहे.