मे-जून महिन्यात पाच किलो धान्य मोफत मिळणार

केंद्र सरकारची मंजुरी
मे-जून महिन्यात पाच किलो धान्य मोफत मिळणार

मुंबई | Mumbai

केंद्र सरकारकडून मे आणि जून २०२१ साठी पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत मोफत धान्य देण्यासाठी मंजूरी दिली आहे.

केंद्र सरकारकडून मे आणि जून २०२१ साठी पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत मोफत धान्य देण्यासाठी मंजूरी दिली आहे. त्यानुसार मे आणि जून महिन्यात गरीबांना ५ किलो मोफत अन्नधान्य उपलब्ध करुन दिले जाणार आहे.

जवळजवळ ८० कोटी लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. तर मोदी यांनी देशात कोरोनाच दुसरी लाट आली असून त्याच्याशी लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. अशातच गरीबांना धान्य मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेवर २६ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च केला जाणार आहे. त्यानुसार ५ किलो धान्य, रेशन कार्डवर वर राहणाऱ्यांचा धान्य कोटा अतिरिक्त असणार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com