आनंदवार्ता! मान्सून आज केरळमध्ये दाखल होणार, महाराष्ट्रात कधी?

हवामानचा विभागाचा अंदाज
आनंदवार्ता! मान्सून आज केरळमध्ये दाखल होणार, महाराष्ट्रात कधी?

मुंबई । Mumbai

यंदा मान्सूनचे (Monsoon) वेळेअगोदरच आगमन होणार आहे. मान्सूनची आगेकूच सुरु आहे. दरम्यान आज मान्सून केरळमध्ये (Kerala Monsoon Forecast) दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

'असनी' चक्रीवादळामुळे यंदा नैऋत्य मोसमी वाऱ्यांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असल्याने मान्सून विनाअडथळा दाखल होणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. तसेच विदर्भात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस बरसणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे. (Monsoon Update 2022)

दरम्यान यावर्षीही पाऊस (Rain) ९९ टक्के पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. २७ मे रोजी पावसाची सुरुवात केरळमध्ये होईल तर पुढील ५ दिवसात महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com