Video : राज्यसभेत अभुतपूर्व गदारोळ; खासदार-मार्शलच्या धक्काबुक्कीचा व्हिडिओ आला समोर

Video : राज्यसभेत अभुतपूर्व गदारोळ; खासदार-मार्शलच्या धक्काबुक्कीचा व्हिडिओ आला समोर

दिल्ली | Delhi

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात (Parliament Monsoon Session) यंदा गदारोळ आणि असंसदीय प्रकाराचा कळस गाठला गेला. दरम्यान राज्यसभेत (Rajyasabha) बुधवारी अभूतपूर्व गदारोळ पाहिला मिळाला. राज्यसभेत (Rajyasabha) सामान्य विमा कंपन्यांचं खासगीकरण करण्यासाठी विमा दुरुस्ती विधेयक मंजूर करताना जोरदार गदारोळ झाला.

विरोधकांनी मर्यादेचं उल्लंघन केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे, तर मार्शल्सकडून (Marshal) खासदारांवर, विशेषत: महिला खासदारांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, राज्यसभेतील या गदारोळाबाबतचा एक सीसीटीव्ही (Rajya Sabha CCTV) व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. यात विरोधी पक्षाचे सदस्य मार्शलसोबत संघर्ष करताना दिसत आहेत.

दरम्यान काँग्रेसचे खासदार आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं आहे. “संसदेत (Parliament) खासदारांवर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ आहे. खासदारांना मारहाण करण्यासाठी बाहेरचे लोक आणले गेले. तरीही, ते अध्यक्षांच्या अश्रूंबद्दल बोलतात. सभागृह चालवणे हे अध्यक्षांचे काम आहे”, असा आरोप राहुल गांधींनी केला आहे.

तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील यावर टीका करताना आपल्या ५५ वर्षांच्या कारकिर्दीत असं काही बघितलं नसल्याचं म्हटलं आहे. “संसदेतील माझ्या ५५ वर्षांच्या करिअरमध्ये (राज्यसभा) महिला खासदारांवर ज्याप्रकारे हल्ला करण्यात आला तसं कधीच पाहिलेलं नाही. सभागृहात बाहेरुन ४० पुरुष आणि महिलांना आणण्यात आलं. हे वेदनादायी असून लोकशाहीवर हल्ला आहे. सभागहात हे योग्य झालं नाही,” असं शरद पवार म्हणाले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com