Rain : मुसळधार पावसामुळे अनेक राज्यांमध्ये महापूरसदृश्य स्थिती, पहा Photo/Video

Rain : मुसळधार पावसामुळे अनेक राज्यांमध्ये महापूरसदृश्य स्थिती, पहा Photo/Video

दिल्ली | Delhi

देशभरात मुसळधार पावसाने (Monsoon Rain Updates) पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. प्रामुख्याने उत्तराखंड (Uttarakhand), ओडीशा (Odisha), हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) अशा राज्यांना पावसाने झोडपून काढल्याने अनेक ठिकाणी महापूर (Floods) तर काही ठिकाणी पूरसदृश्य स्थिती (Flood-Like Conditions) निर्माण झाली आहे.

उत्तराखंड मधील डेहराडून, टिहरी सह अनेक जिल्ह्यात कालपासून जोरदार पाऊस पडत असून टिहरित पावसामुळे रस्ते वाहतूक विस्कळीत झाल्यानं नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात आहे. तर रायपूर येथे ढगफुटी झाल्यानं ४० हुन अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा पावसामुळे राज्यातील सर्व नद्या पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत तर अनेक ठिकाणी भूस्खलनामुळे रस्ते वाहतूक प्रभावित झाली आहे. मंडी जिल्ह्यात विविध ठिकाणी ढगफुटी होऊन नागरिक पुराच्या तडाख्यात अडकल्याची माहिती मिळत आहे. अतिवृष्टीमुळे जीव गमावणाऱ्या ५ लोकांना हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांनी श्रद्धांजली वाहिली.

प्रशासनानं राज्यात एनडीआरएफ आणि विविध यंत्रणांसह युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरु केलं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. बंगालच्या उपसागरात दबाव बनल्याने गेल्या २४ तासांत ओदिशा मध्ये अतिवृष्टी होत असून महानदीला आलेल्या पुरामुळे सुमारे ४ लाख लोक प्रभावित झाल्याचं वृत्त आहे.

जम्मू काश्मीरमध्ये गेल्या २४ तासांत झालेल्या अतिवृष्टीमुळे वैष्णो देवी यात्रा प्रभावित झाली आहे. भूस्खलन आणि बाणगंगेच्या पाण्याची पातळी वाढल्यानं बाणगंगा मार्ग आज दुपारपासून बंद करण्यात आला तर काल रात्रीपासून त्रिकुटा पर्वत परिसरांत होत असलेल्या जोरदार पावसामुळे हिमकोटी मार्ग सुद्धा बंद करण्यात आला आहे.

दरम्यान पारंपरिक मार्गाने यात्रा सुरु आहे. मात्र ढगाळ वातावरणामुळे बॅटरी कार सेवा, केबल कार सेवा आणि हॅलिकॉप्टर सेवा सुद्धा बंद करण्यात आल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com