सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी आणि जावयाची करोडोंची संपत्ती जप्त

मनी लॉड्रिंग प्रकरणी ईडीची कारवाई
सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी आणि जावयाची करोडोंची संपत्ती जप्त

नवी दिल्ली -

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी प्रीती आणि जावई राज श्रॉफ

यांची कोट्यवधींची संपत्ती सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. मनी लॉड्रिंग प्रकरणी जप्त केलेल्या या मालमत्ता या अंधेरीतील असून 10,550 चौरस फूटांच्या दोन व्यावसायिक मालमत्ता आहेत. त्याची किंमत 35 कोटींपेक्षा अधिक आहे.

दरम्यान, या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सुशीलकुमार यांची मुलगी प्रीती श्रॉफ आणि जावयाची सुमारे 35.48 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. दीवाण हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे प्रमोटर्स कपिल आणि धीरज वाधवान यांच्याशी संबंधित एका मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.

मनी लॉड्रिंग कायद्यानुसार जप्त केलेल्या या मालमत्ता मुंबईत अंधेरीमधील आहेत. 10,550 चौरस फूटांच्या दोन व्यावसायिक मालमत्ता आहेत. प्रीती श्रॉफ या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांची बहीण आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com