इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या अध्यक्षपदी मोहित जैन

इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या अध्यक्षपदी मोहित जैन

नवी दिल्ली | प्रतिनिधी New Delhi

इंडियन न्यूजपेपर सोसायटीची (Indian newspaper society) ८२ वी वर्षीय सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. यात नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली....

देशातील वृत्तपत्रे, मासिके आणि नियतकालिकांच्या प्रकाशकांची इंडियन न्यूजपेपर सोसायटी ही सर्वोच्च संस्था आहे. या संस्थेची सभा दृकश्राव्य माध्यमांद्वारे आयोजित करण्यात आली होती. त्यात इकॉनॉमिक टाइम्सचे मोहित जैन यांची २०२१-२२ या वर्षासाठी अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

हेल्थ आणि अँटिसेप्टिक प्रकाशनाचे एल. आदिमूलम यापुर्वी अध्यक्ष होते. त्यांच्यानंतर मोहित जैन यांची निवड झाली. साक्षीचे के. राजा प्रसाद रेड्डी व आज समाजचे राकेश शर्मा यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. अमर उजालाच्या तन्मय माहेश्वरी मानद कोषाध्यक्ष तर सुश्री मेरी पॉल यांची सरचिटणीस म्हणून निवड करण्यात आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com