अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना 59 हजार कोटींची शिष्यवृत्ती

चार कोटींहून अधिक विद्यार्थ्यांना मिळणार लाभ
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना 59 हजार कोटींची शिष्यवृत्ती

नवी दिल्ली -

केंद्रीय मंत्रीमंडळाने बुधवारी (23 डिसेंबर) अनुसूचित जातीच्या (एससी) विद्यार्थ्यांसाठी 59,000 कोटी रुपयांच्या पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेला मंजुरी दिली आहे.

देशभरातील 4 कोटींहून अधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. या शिष्यवृत्तीत 60 टक्के वाटा केंद्राचा तर 40 टक्के वाटा राज्य सरकारांचा असणार आहे. केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत यांनी ही माहिती दिली.

डीटीएच लायसन्स 20 वर्षांसाठी -

केंद्रीय मंत्रीमंडळाने भारतात डीटीएच सेवा देण्यासंदर्भातील नियमांतही सुधारणा करण्यासंदर्भात मंजूरी दिली आहे. यानुसार आता डीटीएच लायसन्स 20 वर्षांसाठी जारी होईल अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. दरम्यान, डीटीएच क्षेत्र 100 टक्के एफडीआयमध्ये आणण्यात आले आहे. सर्वप्रथम वाणिज्य मंत्रालयाने 100 टक्के परकीय गुंतवणुकीला मंजुरी दिली होती. मात्र, माहिती प्रसारण मंत्रालयाच्या नियमावलीमुळे हे पूर्णपणे लागू होत नव्हते. मात्र, आता मंत्रिमंडळाने हा मार्ग मोकळा केला आहे.

दिल्ली येथे बेकायदा वसाहतीत राहणार्‍या लोकांना दिलासा -

केंद्रीय मंत्रीमंडळा दिल्ली येथे बेकायदा वसाहतीत राहणार्‍या लोकांनाही कायदेशीर संरक्षण देण्यासंदर्भातील अध्यादेशालाही मंजुरी दिली आहे. 31 डिसेंबर 2020 ला याच्याशी संबंधित कायद्याचा कालावधी संपत आहे. आता याचा कालावधी तीन वर्ष म्हणजेच 31 डिसेंबर 2023पर्यंत वाढविण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com