Manipur Violence : मणिपूरमध्ये तणाव कायम! CM बिरेन सिंह यांच्या घरावर हल्ला, सुरक्षा रक्षकांचा गोळीबार

Manipur Violence : मणिपूरमध्ये तणाव कायम!  CM बिरेन सिंह यांच्या घरावर हल्ला, सुरक्षा रक्षकांचा गोळीबार

मणिपूर | Manipur

मणिपूरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून हिंसाचार सुरू असून तो अद्याप शमला नाही आहे. या घटनेमुळे मणिपूर अशांत क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, एका ५०० ते ५०० च्या गटाने गुरुवारी सायंकाळी मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्या इंफाळ पूर्वेतील हेनगांग येथील वडिलोपार्जित घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी असलेल्या सुरक्षा रक्षकांनी १०० मीटर अंतरावरच जमावाला रोखले.

जमावाला पांगवण्यासाठी आरएएफ आणि राज्य पोलीस कर्मचाऱ्यांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यानंतर परिसरातील वीज सेवा खंडीत करण्यात आली होती. घराजवळील बॅरिकेड्स वाढवण्यात आल्या आहेत, असं वृत्त एका वृत्तवाहिनीने दिलं आहे. मुख्यमंत्री बिरेन सध्या या घरात राहत नाहीत. ते त्यांच्या शासकीय निवासस्थानी राहतात. इम्फाळमधील हिंगांग भागात मुख्यमंत्र्यांच्या वडिलोपार्जित निवासस्थानावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेच्या एक दिवस आधी थौबल जिल्ह्यातही हिंसक निदर्शने झाली होती. त्यादरम्यान आंदोलक गटाने भाजप कार्यालयाला लक्ष्य केले. आंदोलकांनी गेट तोडले. यानंतर त्यांनी खिडक्यांच्या काचा फोडून पेटवून दिले. मात्र, काही वेळातच सुरक्षा दलांनी जमावाला पांगवले.

Manipur Violence : मणिपूरमध्ये तणाव कायम!  CM बिरेन सिंह यांच्या घरावर हल्ला, सुरक्षा रक्षकांचा गोळीबार
Manipur News : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार! लाठीमारात ४५ विद्यार्थी जखमी, इंटरनेट सेवा बंद

६ जुलैपासून बेपत्ता झालेल्या दोन विद्यार्थ्यांच्या हत्येविरोधात स्थानिक लोकांनी निदर्शने केली. दरम्यान, मंगळवारी रात्री स्थानिक आंदोलक आणि आरएएफ सुरक्षा जवानांमध्ये चकमक झाली. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि आंदोलकांवर लाठीचार्ज केला. या घटनेत ४५ जण जखमी झाले असून यातील बहुतांश विद्यार्थी आहेत. दोन्ही विद्यार्थ्यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे.

Manipur Violence : मणिपूरमध्ये तणाव कायम!  CM बिरेन सिंह यांच्या घरावर हल्ला, सुरक्षा रक्षकांचा गोळीबार
राजधानीत चोरांची ‘धूम’! भिंतीला भगदाड पाडलं अन् कोट्यवधींचे दागिने केले लंपास

सीबीआयचे संचालक अजय भटनागर बुधवारी (२७ सप्टेंबर) आपल्या टीमसह इम्फाळला पोहोचले. मुख्यमंत्री बिरेन सिंग या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सतत संपर्कात आहेत. राज्यातील संभाव्य निदर्शने आणि हिंसाचाराचा सामना करण्यासाठी मणिपूर पोलीस, CRPF आणि RAF चे जवान इम्फाळ खोऱ्यात तैनात आहेत. कोणत्याही अनुचित प्रकाराला सामोरे जाण्यासाठी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com