स्वातंत्र्यदिनी गर्दी टाळावी

गृहमंत्रालयाने जारी केले दिशानिर्देश
स्वातंत्र्यदिनी गर्दी टाळावी

नवी दिल्ली | New Delhi - करोना संकटामुळे coronavirus crisis यंदा स्वातंत्र्यदिनी (15 ऑगस्ट) Independence Day देशभरात होणार्‍या कार्यक्रमस्थळी गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्यासोबत कार्यक्रमात सहभागी होणार्‍यांना मुखाच्छादन (मास्क) लावणे, भौतिक दूरतेच्या नियमांचे पालन करणे तसेच निर्जंतुकीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनात तंत्रज्ञानाचा महत्तम वापर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने Ministry of Home Affairs आवश्यक दिशानिर्देश जारी केले आहेत. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना या दिशानिर्देशांचे पालन करत स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान 15 ऑगस्टचा मुख्य कार्यक्रम दरवर्षी राजधानीतील लाल किल्ल्यावर होत असतो. सकाळी 9 वाजता पंतप्रधान झेंडा फडकवून देशाला संबोधित करत असतात. दरवर्षी होत असतो, तसा कार्यक्रम यावेळी लाल किल्ल्यावर होणार नाही. लाल किल्ल्यावर पंतप्रधान भाषण करतात, त्या व्यासपीठाच्या दोन्ही बाजूला अनेक अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या बसण्याची व्यवस्था असते. यावेळी ही संख्या कमी अर्ध्यावर आणली जाणार असल्याचे समजते. यावेळी विद्यार्थ्यांनाही या कार्यक्रमात सहभागी करून घेतले जाणार नसल्याचे समजते. 15 ऑगस्ला राष्ट्रपती भवनात दुपारी चहापानाचा कार्यक्रमही (अ‍ॅटहोम) सर्व काळजी घेऊन केला जाणार आहे.

करोना योद्ध्यांना समर्पित

स्वातंत्र्यदिनाचा यावर्षीचा कार्यक्रम करोना योद्ध्यांना समर्पित करण्यात आला आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचारी यांना आमंत्रित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. करोनातून बरे झालेल्यांनाही या कार्यक्रमाला आमंत्रित करावे असा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com