चीन, पाकिस्तानला भारत आकाशत टक्कर देणार; काश्मिरमध्ये मिग-२९ तैनात

चीन, पाकिस्तानला भारत आकाशत टक्कर देणार; काश्मिरमध्ये मिग-२९ तैनात

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi

भारतीय हवाई दलाने (Indian Air Force) सीमाभागात देशाच्या सुरक्षेचे महत्त्व लक्षात घेऊन मोठा निर्णय घेतला आहे. जम्मू आणि काश्मीर सारख्या मोक्याच्या भागात संरक्षण स्थिती मजबूत करण्याच्या उद्देशाने हवाई दलाने श्रीनगर विमानतळावर (Shrinagar Airbase) प्रगत मिग-२९ लढाऊ विमानांचा (Mig-29 Fighter Jet) एक स्क्वॉड्रन तैनात केली आहे.

जम्मू-काश्मीर पाकिस्तान आणि चीनच्या सीमेला लागून आहे. अशा स्थितीत येथील एअरबेसवर लढाऊ विमाने तैनात करण्याबाबत खूप दिवसांपासून चर्चा सुरू होती. भारताच्या पाकिस्तानच्या उत्तरेकडील सीमेचे रक्षण करणारे ट्रायडंट स्क्वॉड्रन श्रीनगरमधील या तळावर तैनात करण्यात आले आहे. ट्रायडंट्स स्क्वॉड्रनला सैन्यात 'उत्तरचे रक्षक' असेही म्हणतात.

चीन, पाकिस्तानला भारत आकाशत टक्कर देणार; काश्मिरमध्ये मिग-२९ तैनात
Fire News : भीषण अग्नितांडवात ६७ जणांचा होरपळून मृत्यू

याबाबत, भारतीय वायुसेनेचे स्क्वाड्रन लीडर विपुल शर्मा यांनी यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, काश्मीर खोऱ्यात असलेल्या श्रीनगर एअरबेसची उंची मैदानी भागापेक्षा जास्त आहे. येथे दोन्ही प्रतिस्पर्धी देशांची (चीन आणि पाकिस्तान) सीमा जवळ आहे, अशा परिस्थितीत कमीत कमी वेळात वेगवान प्रतिसाद देणाऱ्या विमानांची गरज होती. मिग-२९ हे विमान यासाठी योग्य आहे कारण त्यामध्ये या परिस्थितीसाठी उत्तम एव्हियोनिक्स आणि लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे आहेत.

चीन, पाकिस्तानला भारत आकाशत टक्कर देणार; काश्मिरमध्ये मिग-२९ तैनात
एकनाथ शिंदे नाराज आहेत का? अजित पवार म्हणाले,....

काश्मीर खोऱ्यातील श्रीनगर हवाई दलाच्या बेसवर आता मिग-२९ ही लढाऊ विमाने सज्ज करण्यात आली आहेत. या एअरबेसवर आतापर्यंत मिग-२१ विमाने सज्ज होती. त्यामुळे आता चिनी हालचालींवर मिग-२९ विमानांची नजर राहणार आहे.

दरम्यान, अपग्रेड केल्यानंतर मिग-२९ मध्ये हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि हवेतून जमिनीवर मारा करणारी शस्त्रेही आहेत. सरकारने हवाई दलाला आणीबाणीच्या परिस्थितीत जी शस्त्रे वापरण्याची परवानगी दिली आहे, ती शस्त्रे विमानातूनही लाँच करता येतील.काश्मीर खोऱ्यात असलेल्या श्रीनगर एअरबेसची उंची मैदानी भागापेक्षा जास्त आहे. इथे दोन्ही चीन आणि पाकिस्तान देशांची सीमाजवळ आहे, अशा परिस्थितीत अल्पावधीतच वेगवान प्रतिसाद देणार्‍या विमानांची गरज होती. मिग-२९ हे विमान यासाठी योग्य आहे. कारण त्यामध्ये या परिस्थितीसाठी उत्तम विमान आणि लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे आहेत.

चीन, पाकिस्तानला भारत आकाशत टक्कर देणार; काश्मिरमध्ये मिग-२९ तैनात
ट्रॅफिक पासून पुणेकरांना मोठा दिलासा! चांदणी चौक उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

हवाई दलाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मिग-२९ मध्ये संघर्ष काळात शत्रूच्या लढाऊ विमानांना जॅम करण्याची क्षमताही आहे. हे विमान रात्री देखील उड्डाण करत लष्कराचे महत्त्वाचे ऑपरेशन्स पूर्ण करण्यास सक्षम आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com