Microsoft करणार भारतीय App ShareChat मध्ये गुंतवणूक ?
देश-विदेश

Microsoft करणार भारतीय App ShareChat मध्ये गुंतवणूक ?

तब्बल १०० दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करणार असल्याची चर्चा

Nilesh Jadhav

दिल्ली | Delhi

भारत चीन वादाचा फटका अनेक चीनी अँपला बसला. त्यात tiktok सारख्या प्रसिद्ध अँपचा ही समावेश होता. भारतासोबत अमेरिकेने देखील tiktok वर बंदी घातली आहे. भारतात tiktok बंद झाल्याने अनेक भारतीय अँप आले. त्यात Share Chat या अँप चा देखील समावेश आहे. सध्या मायक्रोसॉफ्ट नाव खूपच चर्चेत आहे. Microsoft Tiktok खरेदी करण्याच्या विचारात होते, पण आता Microsoft भारताच्या प्रादेशिक भाषेतील Social Media App Share Chat मध्ये १०० दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

देशात शेअरचॅटचे १४० दशलक्षपेक्षा जास्त वापरकर्ते आहे. Microsoft आधी Twitter नेही Share Chat मध्ये १०० दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली आहे. Share Chat हे हिंदी, मराठी सह तब्बल १५ भाषांमध्ये उपलब्ध आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com