एमजी हेक्टर प्लस
एमजी हेक्टर प्लस
देश-विदेश

13 जुलैला एमजी हेक्टर प्लस ही एसयुव्ही लॉंच होणार

आतापर्यंत एमजी मोटर या कंपनीने दोन गाड्या भारतीय बाजारात आणल्या असून हेक्टर प्लस ही त्यांची तिसरी गाडी आहे.

Nilesh Jadhav

एमजी मोटर इंडिया ने आपली बहुचर्चित हेक्टर प्लस ची बुकिंग सोमवार पासून आपल्या अधिकृत संकेतस्थळावरून सुरू केली आहे. आता ती गाडी 13 जुलैला भारतीय बाजारात आणण्यात असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.

आतापर्यंत एमजी मोटर या कंपनीने दोन गाड्या भारतीय बाजारात आणल्या असून हेक्टर प्लस ही त्यांची तिसरी गाडी आहे. हेक्टर प्लस गाडी 6 जणांची आसन क्षमता असलेली एसयुव्ही गाडी आहे. ही गाडी क्रेटा आणि सेल्टोस या गाड्यांना टक्कर देणार असे देखील बोलले जात आहे.

हेक्टर प्लसचे उत्पादन गुजरातच्या फॅक्टरी मध्ये सुरू झाले आहे. कंपनीने या गाडी बद्दलचा एक व्हिडिओ देखील प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओमध्ये या गाडीच्या इंटेरियरचा खुलासा करण्यात आला आहे.

हेक्टर प्लस तीन प्रकारामध्ये येणार आहे. यांना स्मार्ट, सुपर आणि शार्प असे नावे देण्यात आले आहे. यात इंजिनचे तीन पर्याय असतील त्यात 1.5 लिटर पेट्रोल, 1.5 लिटर हायब्रीड आणि 2.0 लिटर डिझेल असे प्रकार असतील.

हेक्टर प्लस सहा रंगात उपलब्ध असेल. त्यात व्हा ईट, सिल्व्हर, ब्लॅक, बरगडी रेड, ग्लेज रेड आणि ब्ल्यू रंगात उपलब्ध होणार आहे. हेक्टर प्लसची एक्स शोरूम किंमत 12.74 लाख रुपयांपासून ते 17.73 लाख रुपयांपर्यंत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com