
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
मेक्सिकोमध्ये (Mexico) शुक्रवारी पहाटे एक भीषण दुर्घटना घडली. प्रवाशांनी भरलेली एक बस (A Bus Full of Passengers) १३१ फूट खोल दरीत कोसळल्यामुळे (Plunged off a Highway) सुमारे १८ जणांचा मृत्यू झाल आहे. तर २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ६ भारतीयांचाही समावेश आहे.
अपघातग्रस्त बसमध्ये ४२ प्रवासी होते, अशी माहिती समोर आली आहे. ही बस मेक्सिको सिटीमधून उत्तर-पश्चिमेकडील टिजुआना (Tijuana) येथे जात होती. या भीषण बस अपघातामध्ये सुमारे २३ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यात भारत, डॉमिनिकन रिपब्लिक आणि आफ्रिकेतील काही देशांमधील नागरिकांचा समावेश होता. हायवेवर असणाऱ्या एका वळणावरही चालकाने वेग कमी केला नसल्यामुळे ही बस पलटून दरीत गेली असं पोलिसांनी म्हटले आहे.
या भीषण दुर्घटनेत आत्तापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही बस १३१ फूट खोल दरीमध्ये कोसळली असल्यामुळे बचावकार्य अवघड होते. बसपर्यंत पोहोचणे आणि जखमींना वरती आणणे या दोन्ही कामांमध्ये अडथळा येत होता. अखेर दोराच्या सहाय्याने ओढून बस बाहेर काढण्यात आली. हा अपघात भीषण असल्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, स्थानिक मीडियाच्या वृत्तानुसार, बस मेक्सिको सिटीहून निघाली होती आणि तिजुआना या सीमावर्ती शहराकडे निघाली होती. नायरित राज्य सरकारने सांगितले की, बस चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. रस्त्याच्या वळणावर तो भरधाव वेगाने गाडी चालवत होता, त्यामुळे हा अपघात झाला, असा अधिकाऱ्यांना संशय आहे.