
बंगळुरू | Bangalore
कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये मेट्रोचा खांब कोसळून एका महिलेसह तिच्या तीन वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना बंगळुरूच्या नागवारा भागात मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली. तेसस्विनी (२५ ) आणि विहान (२.५) अशी या दोघांनी नावे आहेत. या घटनेत मृत महिलेचा पती व मुलगीही गंभीर जखमी झाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कोसळलेल्या खाबाला एका दुचाकीची धडक बसली. या दुचाकीवर चार जण स्वार होते. दुचाकीवर लोहीत याच्यासोबत त्याची पत्नी तेजस्विनी आणि त्यांची जुळी मुलंही होती. तेजस्विनी आणि तिचा मुलगा विहान यांचा या अपघातात मृत्यू झाला. त्याचबरोबर या अपघातात लोहित जखमी झाला आहे.
या अपघातात तेजस्विनी आणि तिचा मुलगा गंभीर जखमी झाले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. यानंतर दोघांनाही रुग्णालयात नेण्यात आलं, तिथं उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. लोहित आणि त्यांच्या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, दुचाकीवरील पती-पत्नी दोघांनीही हेल्मेट घातले होते.
याआधी सप्टेंबर २०२२ मध्ये बेंगळुरुत भीषण दुर्घटना घडली होती. यात रस्ता ओलांडताना एका मुलीला कारने धडक दिली होती. यात कारची धडक बसताच मुलगी हवेत उडून दूर जाऊन पडली होती. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी कार चालकाला अटक केली होती.