सितरंग चक्रीवादळाचा भारताला धोका; 'वाचा' हवामान विभागाचा अंदाज

File Photo
File Photo

मुंबई | Mumbai

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाले आहे. थायलंडने याला 'सितरंग' असे नाव दिले आहे. सोमवारी पहाटे 3 वाजून 17 मिनिटांनी हे वादळ सागर बेटाच्या दक्षिणेस सुमारे 520 किमी अंतरावर आणि बांगलादेशातील बारिसालपासून 670 किमी नैऋत्येस होते...

पुढील 12 तासांत ते उत्तर-ईशान्य दिशेने सरकण्याची आणि तीव्र चक्रीवादळात बदलण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सोमवार आणि मंगळवारी देशाच्या काही किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यामुळे भारतीय किनारपट्ट्यांच्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्रात परिणाम दिसणार नाही, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

या चक्रीवादळाचा प्रभाव प्रामुख्याने ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागात पाहायला मिळू शकतो. चक्रीवादळामुळे भारतीय किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com