
दिल्ली | Delhi
ट्विटर अधिग्रहीत केल्यावर इलॉन मस्कने अनेक नवे बदल ग्राहकांच्या सुविदहेत केले होते. यात ब्ल्यु टिकचा देखील समावेश होता. आधी फ्री असलेल्या या सेवेला पैसे मोजावे लागत आहे. इलॉन मस्कयांच्याच पावलावर पाऊल ठेवत आता फेसबुकचे सह-संस्थापक आणि मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी देखील ब्ल्यु टिक साठी नवी घोषणा केली असून वापरकर्त्यांना पैसे द्यावे लागणार आहे.
फेसबुक आणि इंस्टाग्राम ब्लू टिक साठी चार्ज वसूल करणार आहे. याचाच अर्थ फेसबुक किंवा इंस्टाग्राम वर प्रीमियम व्हेरिफिकेशन सर्विस हवी असेल तर तुम्हाला सब्सक्रिप्शन मॉडलवर यावे लागेल. मेटाच्या मालकीच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम व्हेरिफाइड सर्विससाठी वेब यूजर्सला आता दर महिन्याला ११.९९ डॉलर आणि आयओएस यूजर्सला १४.९९ डॉलर या हिशोबाप्रमाणे चार्ज द्यावे लागतील.
सध्या ही सर्विस ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मध्ये सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे बाकीच्या देशात सुद्धा ही सर्विस लवकरच लाँच केली जावू शकते, असे बोलले जात आहे. आता ही सर्विस पूर्णपणे फ्री आहे. झुकरबर्गने म्हटले की, ही एक सब्सक्रिप्शन सर्विस आहे.
ट्विटरनं नुकतीच त्याची ट्विटर ब्लू पेड सबस्क्रिप्शन सेवा लाँच केली. त्यासाठी दरमहा यूजर्सना पेड सबस्क्रिप्शन प्लान घ्यायचा असल्यास ९०० रुपये मोजावे लागतील. तर सर्वात कमी सबस्क्रिप्शन प्लान हा ६५० रुपयांचा असून हा फक्त वेबसाठीच असणारंय. आता ट्विटरनंतर फेसबुकसुद्धा सेवा पेड करण्यावर भर देत असल्याचं पाहायला मिळतंय. फेसबुकचा प्रीमियम प्लान हा ट्विटरपेक्षाही महागडा असल्याचं दिसून येतंय.