काय सांगता! झोपून पटकावलं ५ लाखांचं बक्षिस

काय सांगता! झोपून पटकावलं ५ लाखांचं बक्षिस

मुंबई | Mumbai

झोपणे हा जर तुम्हा तुमचा जन्मसिद्ध हक्क समजत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. झोपूनही पैसे मिळू शकतात हे पश्चिम बंगालमधील तरुणीने सिद्ध करून दाखवलं आहे. या तरुणीने झोपून ५ लाख रुपयाची बक्षिसांची रक्कम मिळवली आहेत. त्रिपर्णा चक्रवर्ती (Triparna Chakraborty) असं या तरुणीचं नाव आहे.

Wakefit.co द्वारे एका इंटर्नशिप कार्यक्रम (Internship Program) घेण्यात आला होता. यात या सीझनमध्ये सलग १०० दिवसात ९ तास झोपलेल्या स्पर्धकास तब्बल ५ लाखांचं बक्षिस दिल्या जाणार होत. या स्लीपिंग स्पर्धेत (Sleeping Competition) सुमारे ४.५ लाख लोकांनी भाग घेतला होता.

स्पर्धेदरम्यान झोपेचा कालावधी (sleeping Timing), जागे होण्याची वेळ, हलकी झोप आणि गाढ झोप या पॅरामीटर्सवर (Parameters) स्पर्धकांचे परीक्षण करण्यात आले. झोप ही महत्वाची असून त्याबाबत जागरुकता पसरवण्यासाठी १०० दिवसांचा कार्यक्रम राबविण्यात आला.

त्रिपर्णा चक्रवर्ती तिच्या गाढ झोपण्याच्या स्पर्धेत विजय पटकावला. या झोपाळू कौशल्यासाठी तिला ५ लाख रुपयांचं बक्षिस मिळालं. तसेच या स्पर्धेत तिला 'इंडियाज फर्स्ट स्लीप चॅम्पियन' (India's First Sleep Champion) किताब जिंकल्यामुळे तिला मुकूट प्रदान करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com