दिवाळीच्या आनंदावर विरजन; फटाक्यांच्या स्टॉलला लागलेल्या आगीत २ जणांचा मृत्यू

दिवाळीच्या आनंदावर विरजन; फटाक्यांच्या स्टॉलला लागलेल्या आगीत २ जणांचा मृत्यू

विजयवाडा | Vijayawada

आंध्र प्रदेशातील विजयवाडामध्ये फटाक्यांच्या स्टॉलला आग लागली आहे. आग लागल्यानंतर फटाक्यांनीही पेट घेतला आणि काही क्षणात आगीनं भीषण रुप धारण केलं.

या भीषण आगीत २ जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांची ओळख अद्याप पटली नाही. पण या घटनेमुळे दिवाळ सणाच्या आनंदावर विरजन पडले आहे. सध्या घटनास्थळीअग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com