
दिल्ली l Delhi
ताळमिनाडूच्या कुन्नूरमध्ये बुधवारी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस बिपीन रावत यांच्यासह लष्करातील ११ अधिकऱ्यांचे निधन झाले. या सर्वांचे पार्थिव गुरुवारी रात्री दिल्लीत आणण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातील सर्वोच्च लष्करी अधिकाऱ्यांनी गुरुवारी पालम विमानतळावर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, लष्कर प्रमुख एमएम नरवणे, नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार, एअर चीफ मार्शल एव्हीआर चौधरी, संरक्षण सचिव अजय कुमार यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली.
एका हँगरमध्ये १३ शवपेटी ठेवण्यात आल्या होत्या आणि यावेळी कुटुंबातील सदस्यही उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी मृतांच्या कुटुंबीयांकडे जाऊन त्यांच्याशी काही मिनिटे चर्चा केली.