लष्कराच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला; कमांडींग ऑफिसरच्या कुटुंबीयांसह सात जणांचा मृत्यू

लष्कराच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला; कमांडींग ऑफिसरच्या कुटुंबीयांसह सात जणांचा मृत्यू

दिल्ली | Delhi

लष्कराच्या एका ताफ्यावर मोठा दहशतवादी हल्ला झाल्याची घटना मणिपूरमध्ये घडली आहे. या हल्ल्यात ४६ आसाम रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये शाहिद झाले आहेत.

त्यांच्यासमवेत त्यांची पत्नी, मुलगा आणि ड्रायव्हर आणि इतर तीन सैनिक देखील या हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडले आहेत. मागील अनेक वर्षांमधील या क्षेत्रात झालेला हा मोठा दहशतवादी हल्ला मानला जात आहे.

मणिपूरमधील सूरज चंद जिल्ह्यात एस सेहकेन गावाजवळ हा दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी घात लावून हा हल्ला केला.

दहशतवादी संघटना गाझी स्क्वॉडने बेमिना येथे सुरक्षा दलांवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून पाकिस्तान क्रिकेट संघाच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्यांविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या एफआयआरच्या निषेधार्थ हा हल्ला करण्यात आल्याचे संघटनेने म्हटले आहे.

मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. या हल्ल्यात सीओ आणि त्यांचे कुटुंबीयही मारले गेल्याची बातमी त्यांना मीडिया रिपोर्ट्सवरून मिळाली होती, असे त्यांनी सांगितले. राज्य पोलिस आणि निमलष्करी दहशतवाद्यांशी सामना करत आहेत. हल्लेखोरांना सोडले जाणार नाही. असे त्यांनी म्हंटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com