दिल्लीत 'श्रद्धा' हत्याकांडाची पुनरावृत्ती! आधी प्रेयसीला संपवलं, ढाब्यावरील फ्रिजमध्ये मृतदेह लपवला अन् मग...

दिल्लीत 'श्रद्धा' हत्याकांडाची पुनरावृत्ती! आधी प्रेयसीला संपवलं, ढाब्यावरील फ्रिजमध्ये मृतदेह लपवला अन् मग...

दिल्ली | Delhi

श्रद्धा वालकर (Shraddha Walker) सारखेच आणखी एक हत्या प्रकरण (Murder Case) दिल्लीतून समोर आले आहे. पोलिसाना मुलीचा मृतदेह (Girl Dead Body) ढाब्याच्या फ्रीजमध्ये सापडला (Found In Dhaba Fridge). पोलिसांनी आरोपीला अटक करून मृतदेह ताब्यात घेतला. दिल्लीतील हरिदास नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, निक्की यादव (२२) असे मृत तरुणीचे नाव असून, तिचा प्रियकर साहिल गेहलोत (२६) याने ९ आणि १० फेब्रुवारीच्या मध्यरात्री तिचा गळा दाबून खून केला. मृतदेह लपवला. आरोपीचे लग्न दुसऱ्याच तरुणीसोबत निश्चित झाले होते. परंतु प्रेयसी तरुणाच्या लग्नात अडथळा आणत होती. आरोपी साहिलने दुसरीकडे लग्न करावे असे तिला वाटत नव्हते.

दिल्लीत 'श्रद्धा' हत्याकांडाची पुनरावृत्ती! आधी प्रेयसीला संपवलं, ढाब्यावरील फ्रिजमध्ये मृतदेह लपवला अन् मग...
धक्कादायक! पुणे-नाशिक महामार्गावर भरधाव कारने महिलांना चिरडलं, ५ जणींचा मृत्यू

त्यामुळे साहिलने प्रेयसीला मारण्याचा कट रचला. त्याने प्रेयसीला बोलावून तिची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर त्याने प्रेयसीचा मृतदेह ढाब्याच्या फ्रिजमध्ये टाकून पळ काढला. या हत्या प्रकरणात रोहित गहलोत नावाच्या तरुणाचादेखील समावेश आहे. पोलिसांनी त्याला देखील ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. रोहित हा साहिलचा मित्र आहे. मृतदेहातून दुर्गंधी पसरू नये यासाठी त्यांनी तरुणीचा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवला.

दरम्यान, दिल्लीमध्ये झालेल्या श्रद्धा वालकर हत्याप्रकरणामुळे देशभरात खळबळ उडाली होती. 18 मे रोजी महरौली भागात आफताब पुनावाला नावाच्या व्यक्तीने त्याची प्रेयसी श्रद्धाची गळा दाबून हत्या केल्याचा आरोप आहे. हत्येनंतर आफताबने श्रद्धाचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला. यानंतर आरोपीने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केले, तो रोज रात्री हे तुकडे जवळ असलेल्या महरौलीच्या जंगलात जाऊन टाकायचा.

दिल्लीत 'श्रद्धा' हत्याकांडाची पुनरावृत्ती! आधी प्रेयसीला संपवलं, ढाब्यावरील फ्रिजमध्ये मृतदेह लपवला अन् मग...
धक्कादायक! अतिक्रमण हटवताना झोपडीला आग, मायलेकीचा होरपळून मृत्यू

श्रद्धाची हत्या केल्यानंतर आरोपी त्याच फ्लॅटमध्ये राहायचा. १२ नोव्हेंबरला पोलिसांनी आफताबला अटक केली होती. आफताबने नार्को आणि पॉलीग्राफी टेस्टमध्ये श्रद्धाची हत्या केल्याचं कबूल केलं, यानंतर आफताबविरोधात दिल्ली पोलिसांनी चार्जशीटही दाखल केली

दिल्लीत 'श्रद्धा' हत्याकांडाची पुनरावृत्ती! आधी प्रेयसीला संपवलं, ढाब्यावरील फ्रिजमध्ये मृतदेह लपवला अन् मग...
Valentine Day : ...आणि हो प्रेमाला वयाची मर्यादाही नसते! आजी-आजोबाच्या VIDEO चा सोशल मीडियावर धुमाकूळ
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com