ममता बॅनर्जी दिल्लीत आज नितीन गडकरींची घेणार भेट

ममता बॅनर्जी दिल्लीत आज नितीन गडकरींची घेणार भेट

नवी दिल्ली / New Delhi - पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पाच दिवसांच्या दिल्ली दौर्‍यावर असून त्या आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेणार आहेत. ममता बॅनर्जींनी याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोनिया गांधी, राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली आहे.

आज चौथ्या दिवशी ममता बॅनर्जी या केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसोबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते संजय राऊत, जावेद अख्तर, शबाना आझमी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. ममता बॅनर्जी यांनी बुधवारी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये त्यांनी देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केल्याचं समजते.

पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या दिल्ली भेटीदरम्यान पेगॅसस प्रकरणावरुन देशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. पेगॅसस प्रकरणामध्ये ज्या 40 लोकांवर केंद्र सरकारने पाळत ठेवल्याचा आरोप केला जातोय त्यामध्ये ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांचाही समावेश आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com