नवलच! एक दोन नव्हे तर तब्बल ११ वेळा घेतली करोना लस, कारण काय तर म्हणे....

नवलच! एक दोन नव्हे तर तब्बल ११ वेळा घेतली करोना लस, कारण काय तर म्हणे....

दिल्ली | Delhi

करोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटने जगासमोर पुन्हा एकदा निर्बंधांचे युग आणले आहे. पण तरीही असे अनेक लोक आहेत जे करोना व्हायरस आणि लसीच्या मानकांशी खेळत आहेत. अशीच एक धक्कादायक धक्कदायक घटना बिहारमध्ये उघडकीस आली आहे.

बिहारमधील एका वृद्धाने एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर तब्बल ११ वेळा करोनाची लस (corona vaccination) घेतली. ब्रह्मदेव मंडल असे त्या वृद्धाचे नाव आहे. ब्रह्मदेव मंडल यांनी १० महिन्यांत वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल ११ वेळा करोनाची लस घेतली (corona vaccination) आहे. असा दावा खुद्द त्यांनीच केला आहे.

१२ व्यांदा लस घेण्याचा प्रयत्न केला; परंतु, त्यांना यश मिळू शकले नाही. करोनाची लस घेतल्यानंतर गुडघेदुखी (Relief from knee pain) कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. गुडघेदुखीतून कायमची सुटका मिळावी यासाठी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून लसी घेतल्या.

ब्रह्मदेव मंडल यांचे वय आधार कार्डवरील नोंदीनुसार ८४ वर्षे आहे. ते टपाल विभागात काम करायचे सध्या सेवानिवृत्तीनंतर गावातच वास्तव्यास आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी लसीचा पहिला डोस १३ फेब्रुवारी रोजी पुरौनी पीएससीमध्ये घेतला होता. त्यानंतर १३ फेब्रुवारीपासून ३० डिसेंबर २०२१ पर्यंत त्यांनी लसीचे ११ डोस घेतले होते. त्यांनी घेतलेल्या लसींची संपूर्ण माहिती टाइम आणि ठिकाण कागदावर नोंदवून ठेवले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com