बोट उलटून २२ जण बुडाले; बचाव कार्य सुरु

बोट उलटून २२ जण बुडाले; बचाव कार्य सुरु
File photo

दिल्ली | Delhi

बिहारमध्ये आज (रविवार) सकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. बिहारच्या चिरैया विभागातील शिकारगंज पोलीस ठाण्यांतर्गत सिकरहना नदीत एक नाव उलटल्याने २२ जण बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

बुडालेल्यांपैकी ६ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. उर्वरित लोकांचा शोध सुरू आहे. बोट उलटल्याची बातमी पसरताच आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. पोलीस-प्रशासनालाही कळवण्यात आलं. तोपर्यंत गावकऱ्यांनी नदीत बुडालेल्या लोकांचा शोध सुरू केला.

प्रशासनाने स्थानिक लोकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू केले आहे. स्थानिक लोकांनी सांगितले की, बोटीवर २० ते २५ लोक होते. पोलीस प्रशासनाचे अधिकारी मोठ्या संख्येने पोहोचले आहेत. मोठ्या संख्येने लोकही जमले आहेत. स्थानिक गोताखोरही बचाव कार्यात सहभागी आहेत.

Related Stories

No stories found.