महात्मा गांधींच्या चष्म्याचा 21 ऑगस्टला ब्रिटनमध्ये लिलाव
देश-विदेश

महात्मा गांधींच्या चष्म्याचा 21 ऑगस्टला ब्रिटनमध्ये लिलाव

ऑनलाईन पद्धतीने लिलाव

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

लंडन | London -

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी परिधान केलेल्या सोन्याच्या कडा असलेल्या चष्म्याचा ब्रिटनमध्ये येत्या 21 ऑगस्टला ऑनलाईन लिलाव होणार आहे. महात्मा गांधी यांनी 1900 साली हा चष्मा घातला होता. त्यानंतर त्यांनी ब्रिटनमधील एका कुटुंबाला हा चष्मा भेट म्हणून दिला होता. गांधीजींच्या या चष्म्यांचा लिलाव 10-15 हजार पाऊंड म्हणजे भारतीय मुल्यानुसार 9.77 ते 14.68 लाख रुपयांपर्यंत होईल, असे सांगण्यात आले आहे. Mahatma Gandhi's Gold-Plated Glasses To Be Auctioned

दक्षिण-पश्चिमी इंग्लंडच्या उपनगरातील हनहम येथील कंपनी ईस्ट ब्रिस्टल ऑक्शसने यासंदर्भात माहिती देताना सांगितले, इंग्लंडमधील एका वृद्ध विक्रेत्याकडे गांधीजींचे हे चष्मे होते. या विक्रेत्याच्या काकांना महात्मा गांधींनी स्वत: हे चष्मे भेट दिले होते. ब्रिटीश पेट्रोलियममध्ये काम करत असताना 1910-30मध्ये गांधीजींनी त्यांना ही भेट दिली होती. या चष्म्याला मोठा सुवर्ण इतिहास आहे.

महात्मा गांधींच्या चष्म्याच्या जोडीचा 21 ऑगस्टला ऑनलाईन पद्धतीने लिलाव होत असून अनेक ग्राहकांना या चष्म्याने आकर्षित केले आहे. भारतीयांना या चष्म्याच्या खरेदीसाठी विशेष उत्साह असल्याचे दिसून येते. आताच सहा हजार पाउंडला या चष्म्याची ऑनलाईन मागणी करण्यात आली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com