मंबई -

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंब्यासाठी आणि केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात

एक ठराव मंजूर केला आहे. कृषी कायद्यांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या शेतकर्यांचा आज आंदोलनाचा सलग आठवा दिवस आहे.

पंजाब, हरयाणा येथील शेतकर्यांनी निर्धाराने आंदोलन पुकारले असून केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घ्यावेत या मागणीवर ते ठाम आहेत. या आंदोलनाला आता विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनीही पाठिंबा जाहीर केला आहे.

दरम्यान, शेतकर्यांच्या आंदोलनामुळे गुरुवारी सलग आठव्यादिवशी दिल्ली एनसीआरच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दिल्लीच्या अनेक सीमा अद्यापही बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर अनेक महामार्ग शेतकर्यांनी अडवून ठेवले आहेत.

सफाई कामगारांचाही शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा

दरम्यान, युपी गेटवर सुरु असलेल्या आंदोलनात ऑल इंडिया सफाई मजदूर काँग्रेस संघटनेने शेतकर्यांना पाठिंबा जाहिर केला आहे. केंद्र सरकारने शेतकर्यांच्या मागण्या त्वरीत मान्य केल्या नाहीत तर संपूर्ण भारतात सफाईचं कार्य बंद करुन आपत्कालीन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.