
दिल्ली | Delhi
योग गुरु बाबा रामदेव यांची कंपनी पतंजलिला मद्रास उच्च न्यायालयाने १० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच कोरोनील या शब्दाचा उपयोग न करण्याचा आदेश देखील मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे. तसेच सामान्य लोकांमधील भीतीचा फायदा घेऊन पतंजलिने तयार केलेले कोरोनिल करोनाचे औषध असल्याचे सांगत आहे. पण पतंजलीने तयार केलेले कोरोनिल औषध फक्त सर्दी, खोकला आणि तापावर उपयुक्त असल्याने देखील कोर्टाने म्हंटले आहे.
पतंजलीने काही दिवसापूर्वी करोनाचे औषध तयार केल्याचे जाहीर केले होते. कोरोनिल असे या औषधाचे नाव ठेवण्यात आले होते. पण सरकार कडून या औषधाला अधिकृत परवानगी मिळालेली नव्हती. तरी देखील पतंजली रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याचे औषध म्हणून कोरोनिलला बाजारात विकत होती.