मध्यप्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे निधन
देश-विदेश

मध्यप्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे निधन

ते मूत्रपिंड आणि यकृताच्या आजाराने ग्रस्त होते

Nilesh Jadhav

लखनौ | Lucknow

मध्यप्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले आहे. उत्तरप्रदेश सरकारमधील मंत्री व त्याचा मुलगा आशुतोष टंडन यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे,"बाबूजी आता राहिले नाहीत."

लालजी टंडन गेले कित्येक दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर लखनऊ येथील मेदांता हॉस्पीटल मध्ये उपचार सुरू होते. त्यांना 11 जूनला हॉस्पीटलमध्ये आणण्यात आले होते. त्यांना हॉस्पिटल मध्ये नेल्यानंतर राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे मध्यप्रदेशचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता.

Deshdoot
www.deshdoot.com