
दिल्ली (Delhi)
देशभरातील इंधन दरांमध्ये (Fuel Rate) सातत्याने होणाऱ्या वाढीने सर्वसामान्य हैराण झाले आहे. दरम्यान ही दरवाढ रोखण्यासाठी केंद्र सरकार (Central govt) आणि राज्य सरकारही (State Govt) प्रयत्नशिल आहे.
आज व्यावसायिक वापरासाठी असलेल्या १९ किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरमध्ये (Lpg Gas Price Today) मोठी कपात करण्यात आली आहे. व्यावसायिक वापरासाठीच्या गॅस सिलेंडरच्या (Commercial Lpg Cylinder Rate) दरात १३५ रुपयांची कपात करण्यात आली आहे. मात्र घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर (Domestic Lpg Cylinder Rate) ग्राहकांसाठी असलेल्या १४.२ किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नाही.
याआधीही गेल्या महिन्यात १९ तारखेला घरगुती एलपीजी सिलेंडर आणि व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती वाढवण्यात आल्या होत्या. त्यामुळे १४ किलोच्या घरगुती सिलेंडरच्या दरात ३.५० रुपयांनी तर १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात ८ रुपयांनी वाढ करण्यात आली होती. याआधीही मे महिन्यात एलपीजी सिलिंडरच्या दरात एकदा वाढ करण्यात आली होती.